मुंबई – नेहमी बॉलीवूड कलाकारांवर टीका करणारा कमल आर. खान अर्थात केआरके पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. बॉलीवूड चित्रपटांबाबत तो खुलेपणाने आपले मत व्यक्त करतो. काही दिवसांपूर्वी केआरकेने कपिल शर्माला पनौती म्हंटले होते. यासाठी त्याने काही उदाहरण देखील दिले होते.
शाहरुख खान कपिल शर्माच्या शोमध्ये गेला नाही म्हणून पठाण सुपरहिट झाला असं केआरके म्हणाल होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने कपिलला डिवचले आहे. यासाठी केआरकेने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने अक्षय कुमारच्या सेल्फी चित्रपटाचा उल्लेख केला आहे.
Finally @akshaykumar has done good thing by not promoting #Selfiee on #KapilSharmaShow! Akki understood that #KSS is a big Panauti for films.
— KRK (@kamaalrkhan) February 16, 2023
शेवटी अक्षय कुमारने चांगला निर्णय घेतला आपला चित्रपट प्रमोट करण्यासाठी तो कपिल शर्माच्या शोमध्ये येणार नाही असं ट्विट के आर केने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून केआरके वारंवार कपिल शर्मावर ट्विटरवरून टीका करताना दिसून येतो. खिलाडी अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.मात्र प्रमोशनसाठी अक्षय कपिल शर्मा शोमध्ये जाणार नसल्याने केआरकेने कपिलला टोला मारला आहे.