बेंगळुरू – निवडणुकीच्या वर्षात शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या व्याजमुक्त अल्प मुदतीच्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली केली आहे. बोम्माई यांनी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला त्यात त्यांनी ही घोषणा केली आहे.
यंदा 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 25,000 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जाईल असे त्यांनी म्हटले आहे. रामनगर जिल्ह्यातील रामदेवरा बेट्टा येथे भगवान रामाचे ‘भव्य’ मंदिर बांधले जाईल अशी घोषणाही बोम्मई आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केली आहे.
सरकारने ‘किसान क्रेडिट कार्ड’ धारकांसाठी ‘भू सिरी’ या नवीन योजनेअंतर्गत 2023-24 मध्ये 10,000 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला.यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर कृषी सामग्री खरेदी करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ‘श्रमशक्ती’ योजनेची घोषणा केली ज्यात भूमिहीन महिला शेतमजूरांना प्रत्येकी दरमहा 500 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे.