करोनाची लागण झाल्यामुळे सिंगर कनिका कपूर गेल्या कित्येक दिवसांपासून पीजीआयच्या करोना वॉर्डमध्ये ऍडमिट आहे. कनिकाची एक-दोनदा नव्हे तर तब्बल पाचवेळा करोनाची टेस्ट करण्यात आली आणि दरवेळी ती पॉझिटिव्ह आली होती. तेंव्हापासून तिला क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आणि तिच्यावर उपचारही सुरू आहेत.
आता अलिकडेच कनिकाची केलेली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. म्हणजेच कनिकाला झालेले इन्फेक्शन आता हटवले गेले आहे. याच रिपोर्टच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा टेस्ट केली जाणार आहे. आता कनिकाची तब्येत सुधारते आहे. आता टेस्ट निगेटिव्ह आल्याने तिला खूप बरे वाटायला लागले आहे.
तिने उपचार करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांनाही गाणी म्हणून दाखवायला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर ती हॉस्पिटलच्या स्टाफला बॉलिवूडमधील अनेक किस्सेही ऐकवते आहे. विदेशात जाऊन आल्यानंतरही गर्दीच्या कार्यक्रमात गेल्याबद्दल कनिकावर गुन्हाही दाखल झाला आहे.
त्यापेक्षाहीए तिला झालेले इन्फेक्शनची चिंता अधिक सतावत असणार. आता जरी टेस्ट निगेटिव्ह आली तरी तिला लगेच हॉस्पिटलमधून सोडले जाणार नाही. डिस्चार्ज मिळण्यासाठी कनिकाला आणखी काही दिवस वाट बघायला लागण्याची शक्यता आहे.