देशभरात करोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. या साथीमुळे सर्वजण घरात आहेत. यावेळी घरापासून ते ऑनलाइनपर्यंत अनेक बदल घडत आहेत. अन्यथा, जगभरात सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये गायक कनिका कपूर सामील होईल असा विचार कदाचित क्वचितच कोणाला आला असेल. पण, हे खरं आहे.
विशेष म्हणजे, कनिकाने देसी गर्ल प्रियांका चोप्रालाही मागे टाकले आहे. याहू इंडियाची आकडेवारी पाहिली असता बेबी डॉल गायिका कनिका कपूर करोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सर्वात जास्त ऑनलाइन सर्च ठरली आहे. खरं तर, विदेशातून आल्यानंतर पार्टी केल्याच्या आणि आठवडाभरानंतर पॉझिटिव्ह आढळल्याने बरीच खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी कनिकाला लक्ष्य केले होते.
यानंतर कनिकाला ऑनलाइन सर्च करण्यास सुरुवात झाली आणि अनेक जण कनिकाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक झाले. त्यानंतर जगभरात कनिका एक “कीवर्ड’ म्हणून उदयास आली, जिच्या वेगवान शोध सुरू केला. सर्च इंजिनने असेही म्हटले आहे की, कनिका केवळ महिलाच नव्हे तर मेल आणि फिमेल या दोन्हीही व्यक्तींमध्ये देशात आघाडीवर आहे.