मुंबई – काही महिन्यांपूर्वी ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक बदल ट्विटर मध्ये केले असल्याचं दिसून आलं आहे. एलॉन मस्क यांनी काही दिवसांतच ट्विटरवर व्हेरिफाइड असणाऱ्या अकाउंट्सबाबत एक महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानंतर ट्विटरवर ब्ल्यू टिक असेल तर ते अकाउंट वापरण्यासाठी तुम्हाला प्रतिमाह काही पैसे ट्विटरला द्यावे लागणार असं सांगण्यात आलं होत.
दरम्यान, ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्या या निर्णयानंतर आता मार्क झुकरबर्ग देखील आक्रम झाले असून त्यांनी देखील फेसबुक संदर्भात एक मोठी घोषणा केली केली आहे. यापुढे आता ट्विटर प्रमाणेच तुम्हाला फेसबुकच्या ब्लू टीकसाठी सुद्धा पैसे मोजावे लागणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपची मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे.
सध्या या प्रीमियम व्हेरिफिकेशनची सुरुवात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार असून, त्यानंतर अन्य देशातही ही सर्व्हिस होणार आहे. दरम्यान, आता फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या निर्णयानंतर बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणजेच, अभिनेत्री कंगना राणावत हिने थेट मार्क झुकरबर्ग यांच्यावर काॅपी केल्याचा आरोप केला आहे. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
Ha ha @elonmusk fought with the whole world to do this,media criticised him and people threatened to leave twitter, he hasn’t even rolled out all features and his ideas such big hit that and people already hijacked his ideas and copying them, biggest drawback of being a genius.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 20, 2023
नुकतंच मार्क झुकरबर्गच्या पोस्टवर एका युजर्सने कमेंट केली. त्यावर कंगना राणावत हिने लिहिले की, “हा… हा…एलन मस्क यांनी हे करण्यासाठी संपूर्ण जगाशी लढा दिला. सर्वांनी एलन मस्कवर टिका केली. लोकांनी ट्विटर सोडण्याच्या धमक्याही दिल्या. त्याने सर्व सेवा देखील आणल्या नाहीत आणि त्याची कल्पना इतकी मोठी हिट आहे की लोकांनी आधीच त्याची कल्पना हायजॅक करून कॉपी केली’. असं कंगना म्हणाली आहे, सध्या अभिनेत्री ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.