अभिनेत्री कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेल हिचे ट्विटर अकाऊंट काही काळासाठी सस्पेंड करण्यात आले. ट्विटरचे नियम मोडल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर तिच्या विरोधात पोलीस तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्याने कंगनाने बहिणीला पाठिंबा दिला होता. पण आता कंगना विरोधात देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कंगनाच्या विरोधात वकील अली कासिफ खानने तक्रार केली आहे. एक बहीण समाजात द्वेश पसरवण्याचे काम करते. तर दुसरी बहीण तिला पाठिंबा देते आहे. सध्या संपूर्ण देशात तिचे अकाऊंट बंद करण्याची मागणी केली जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
रंगोली चंडेल सोशल मीडियावर द्वेश पसरवण्याचे काम करते. प्रसिद्धीसाठी ती ठराविक समुदायाच्या लोकांना टारगेट करते. देश करोनासारख्या प्राणघातक विषाणूच्या संकटात असताना तिने धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम अद्याप थांबवलेले नाही. त्यामुळे रंगोली विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे अली कासिफ खान यांनी म्हटले होते. दरम्यान, अभिनेता संजय खान यांची मुलगी फराह खान अली हिने देखील रंगोलीवर टीका केली होती.