सडक 2 चा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याच्या नापसंतीच्या बातम्याच अधिक चर्चेत आल्या. या ट्रेलरला तब्बल 70 लाख जणांनी डिस्लाईक केल्याची बातमी नुकतीच व्हायरल झाली होती. आता कंगणा रणावतनेही या ट्रेलरलाही डिसलाईक केले आहे.
आलिया भट्ट, संजय दत्त, पूजा भट्ट आणि आदित्य रॉय कपूरच्या या सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याबद्दल पूजाने नेटिझन्सना धन्यवादही दिले आहेत. तरिही कंगणाने आपली नाराजी जरा हायलाईट केली. एवढेच नव्हे तर कंगणाने या सिनेमातील डायलॉगवरही जोरदार आक्षेप घेतला आहे.
एका सीनमध्ये आलिया एका धर्मगुरुच्या फोटोकडे बघून या गुरूंमुळे मी एका जवळच्याला गमावले आहे. असे म्हणताना दिसते आहे. यावर काही जणांनी आक्षेप घेतला आहे. एका चित्रपट समीक्षकाने या डायलॉगमधील गुरू शब्द हटवून मौलवी किंवा पादरी शब्द बदलून दाखवावा. असे आव्हानच निर्मात्यांना दिले. त्या ट्विटला रिप्लाय देत कंगणाने चांगले निरीक्षण आहे.
साधूंच्या हत्येचा या पूर्वग्रहदूषित सीनशी काही संबंध आहे का? कैलाश घोटाळ्याला मक्का घोटाळा म्हणून तरी बदलले जाईल का? पाकिस्तानी दलालांना धार्मिक घृणा पसरवण्याची अनुमती दिली जाते आहे का? असा सवाल उपस्थित केला. आता यावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.