नवी दिल्ली – भारतीय लष्कराने लडाखमध्ये चीनसोबत असणाऱ्या सीमेवर के-9 वज्र हॉवित्झर पथक तैनात केले आहे.
क-9न वज्र हे के-9 थंडरचे स्वदेशी बनवाटीच्या अत्याधुनिक तोफा असून त्या लार्सन अँड टुब्रोने द. कोरीयाच्या तंत्रज्ञानाने विकसित केल्या आहेत. भारतीय लष्कराने लडाखमध्ये टी-90 रणगाडेही तैनात केले आहेत.
या तोफा अति उंच पर्वतीय क्षेत्रातही सक्षमपणे कार्यरत राहतात. त्यांची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर घेतली जाणारी चाचणी त्यामुळे आम्ही पूर्ण रेजिमेंट उतरवली आहे, ते आमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. के-9 वज्र तोफांच्या ऑर्डर दिलेल्या 100 पैकी 51 तोफा मुदतीपुर्वी लष्कराला मिळाल्या आहेत.