जुन्नर (पुणे) – करोना रुग्णांनी शुक्रवारी जुन्नर तालुक्यातील उच्चांकी 86 एवढा आकडा गाठला आहे. तर तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. तालुक्यातील रुग्णसंख्या आता 998वर पोहोचली आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी ओतूर 13, नारायणगाव 11, येडगाव 10, बोरी बुद्रुक 9, येणेरे 6, बेल्हे, आळे, सावरगाव येथे प्रत्येकी 5, वडज 4, उदापूर, काले, पिंपळवंडी येथे प्रत्येकी 2, काटेडे, कांदळी, आर्वी, सोमतवाडी, डिंगोरे, उंब्रज नं. 2, राजुरी, शिरोली खुर्द, पिंपरी पेंढार या गावांमध्ये प्रत्येकी 1 करोनाबाधित आढळले आहेत. तर जुन्नर नगरपरिषद हद्दीमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील एकूण 885 बाधितांपैकी 598 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.