जुन्नर -जुन्नर तालुक्यात गुरुवारी नव्याने 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येत वाढ होऊन 16 हजार 702 झाली आहे. तर 15 हजार 379 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. 577 रुग्णांचा मृत्यू तर 746 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आळे, गुळुंचवाडी गावात सर्वाधिक प्रत्येकी 4 रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल आळेफाटा, उंब्रज नं. 1, जुन्नर, मंगरुळ, पिंपळवंडी, बोरी बुद्रुक, ओतूर येथे प्रत्येकी 3, बेल्हे, पारगाव तर्फे आळे,
आर्वीद्व पिंपरी पेंढार, गायमुखवाडी येथे प्रत्येकी 2; तर वडगाव आनंद, मढ, औरंगपूर, हिवेर तर्फे नारायणगाव, नारायणगाव, येडगाव, धोलवड, खोडद, उंचखडक व राजुरी या गावांत प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.