जुन्नर -जुन्नर तालुक्यात शुक्रवारी (दि. 3) खानगाव येथे एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे रुग्णांची संख्या 78 झाली आहे. हा व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून खानगाव येथेच होता; मात्र गेल्या आठवड्यात ही व्यक्ती मुंबई येथे गेली होती. तेथून आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील एकूण 78 करोनाबधितांपैकी यांपैकी 42 जण बरे झाले असून 34 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान लेण्याद्री येथील सेंटरमध्ये शुक्रवारी (दि. 3) 20 संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
अधिकांश करोनाबाधित शहरीबाबूच
आत्तापर्यंत जुन्नर तालुक्यात आढळलेले अधिकांश बाधित हे मुंबई किंवा परिसरातून आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ठ झाले आहे. त्यामुळे शहरी नागरिकांनी गावांमध्ये फिरताना सोशल डिस्टंसिंगचे भान ठेवणे, मास्क वापरणे, होम क्वारंटाइनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. जुन्नर नगरपालिकेसह मोठ्या शहरांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांनाविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू आहे.