नगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करून सत्तेत सहभागी होत आज उपमुख्यमंत्रीपदाचा शपथ घेतल्यानंतर नगर शहरामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी सुरेश बनसोडे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, कवाडे गटचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, सोमा शिंदे, अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, पप्पु पाटील, अमोल जाधव, वैभव साळुंके, सचिन कसबे, राहुल सोनटक्के आदी पस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे म्हणाले, की शहराचे आमदार संग्राम जगताप देखील अजित पवार यांच्याबरोबर असून कार्यकर्त्यांचा पक्ष फक्त आमदार संग्राम जगताप आहे. पवार उपमुख्यमंत्री झाल्याने शहरातील विकास कामांना आता वेग मिळणार असल्याचे ते म्हणाले.