मुंबई – ‘आरआरआर’ फेम ज्युनियर एनटीआरने अप्रतिम अभिनयाने कमी कालावधीतच चाहत्यांच्या मनात आपले स्थान पक्के केले आहे. त्याचा फॅन फॉलोईंगही मोठा आहे. लवकरच ज्युनियर एनटीआर नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या आगामी चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील दिसणार आहेत.
मागील काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. अखेर या चित्रपटाचे नाव जाहीर झाले आहे. तसेच या चित्रपटाचा फस्ट लुक देखील समोर आला आहे. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाचे नाव ‘देवरा’ असे आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी ज्युनियर एनटीआरचा लूक दाखवला आहे.
View this post on Instagram
पोस्टरमध्ये अभिनेता हातात हत्यार घेऊन उभा राहिल्याचे दिसते. तर त्याच्या समोर अनेक मृतदेह असल्याचेही दिसते. काळ्या कपड्यांमधील एनटीआरचा स्वॅग पाहून त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत. निर्मात्यांनी ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’च्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना पुढील वर्षापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 5 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.