#CWC19 : विश्‍वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियन संघाला धक्‍का, झाय रिचर्डसन जायबंदी

मेलबर्न – 30 मे रोजी इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियन संघाला धक्का बसला आहे. जलदगती गोलंदाज झाय रिचर्डसनहा खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्‍वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. मार्च महिन्यात युएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात रिचर्डसनच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्या ऐवजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केन रिचर्डसनला बदली खेळाडू म्हणुन संधी दिली आहे.

मार्चमध्ये पाकिस्तानविरोधातल्या दुसऱ्या वनडेमध्ये झाय रिचर्डसन जखमी झाले होते. त्यानंतरही त्यांचा विश्‍वचषका साठीच्या संघात समावेश करण्यात आला होता. भारतात झालेल्या वनडे सीरिजमध्येही त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते आणि पाच सामन्यात सात बळी मिळवले होते. त्यानंतर त्याला संघातील प्रमुख गोलंदाज समजले जात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या 12 सामन्यात झाय रिचर्डसने 24 बळी मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल स्टाफने त्याची तपासणी केली असता तो विश्‍वचषकामध्ये खेळण्यासाठी पूर्णतः तंदुरुस्त नसल्याचे समोर आले होते. ऑस्ट्रेलिया टीमच्या डेव्हीड बेकली यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. बेकली म्हणाले, ही बातमी टीम आणि झायसाठी दुर्दैवी आहे. गेल्या काही काळापासून झाय शानदार प्रदर्शन करत आहे. परंतु तो विश्‍वचषकासाठी खेळण्यास तंदुरुस्त नसल्याचं मेडिकल चेकअपमधून उघड झाले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने झाय रिचर्डसनच्या जागी केन रिचर्डसनला संघात जागा दिली आहे. निवड समितीने जोश हेजलवुडच्या ऐवजी केनची निवड केली होती. हेजलवुडला संघात राखीव खेळाडू ठेवण्यात आले होते. पाठीच्या दुखण्यामुळे ते संघातून बाहेर गेले होते. झाय रिचर्डसन यांना इंग्लंडविरोधात होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ए संघातून खेळण्याची इच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)