मुंबई – करिना आणि सैफचा मुलगा तैमूर जितका मीडियामध्ये चर्चेत होता त्याहून अधिक जेह अली खान चर्चेत असतो. फॅन्सही जेहची प्रत्येक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. मग जेह कधी कॅमेऱ्यासमोर पोज देतो तर कधी फक्त ऍक्शन करतो. परंतु तरी देखील चाहत्यांना त्याची प्रत्येक गोष्ट आवडते. नुकतंच तो आपल्या आईसोबत एका हॉटेलमध्ये जाताना दिसला.
करिनासोबत जेहला पाहून अनेकांनी बेस्ट मॉम अँड सन अशा कमेंट केल्या आहेत. करिनाने आपल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमधील एका हॉटेलमध्ये जातानाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये जेह आपल्या आईचे बोट धरून चालताना दिसत आहे. काळे शूज, काळा सनग्लासेस आणि काळा स्वेटर घालून जेह आपल्या वेगळ्या अवतारात यावेळी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर करीना कपूरने ग्रे रंगाची हुडी आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. केस बांधलेले आहेत. आई-मुलाची ही गोंडस जोडी पाहून चाहते चांगलेच खुश झालेत.
View this post on Instagram
फोटो शेअर करताना करीना कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की,Off to work with my Boy…but a quick Pose before we leave…Jeh baba Kaam pe chalo..यासोबतच करिनाने रेड हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. आलिया भट्ट, करिश्मा कपूर आणि अमृता अरोरा यांनी करिनाच्या या फोटोंवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत दोघांनाही सुपरस्टार म्हटले आहे. करिनाने जेहचा ‘जेह बाबा’ असा केलेला उल्लेख चाहत्यांना चांगलाच आवडल्याचे समजते. शिवाय खरंच दोघे सोबत काम करणार आहेत का ? अशी देखील चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.