‘ते असभ्यतेची कोणतीच पायरी सोडत नाहीयेत’

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जावेद अख्तर यांची टीका

मुंबई – अमेरिकेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी संसदेच्या परिसरात अभूतपूर्व गोंधळ घातला आणि पोलिसांबरोबर त्यांचा जोरदार हिंसाचारही झाला. या प्रकरणाचा जगभरातील सर्वच नेत्यांनी आणि कलाकारांनी तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. अशातच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही आता ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

जावेद अख्तर म्हणाले कि, यावरुन हे स्पष्टपणे दिसून येतेय की डोनाल्ड ट्रम्प असभ्यतेची कोणतीच पायरी सोडत नाहीयेत. ते प्रत्येक कृतीतून एकच दाखवायचा प्रयत्न करत आहेत की ते खुज्या मनोवृत्तीचे आहेत, अशी टीका त्यांनी ट्रम्प यांच्यावर ट्विटरद्वारे केली आहे.

 

दरम्यान, अमेरिकेच्या संसद भवनात झालेल्या अभूतपूर्व अशा हिंसक आंदोलनामुळे आता मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत भर पडताना दिसत आहे. घटनेप्रकरणी आता त्यांच्या सोशल मीडिया वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राममागोमाग आता ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरही कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.

तर हिंसाचाराबाबत रिपब्लिकन पार्टीच्या जवळपास 100 सिनेटर्सनी पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनाच थेट जबाबदार धरले आहे. ट्रम्प यांचे सहकारी तसेच त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे सत्र कायम ठेवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.