मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) देखील सिनेक्षेत्रात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अल्पावधीतच ती बॉलीवूडमध्ये स्वत: वेगळी ओळख निर्माण करत आहे. परंतु अभिनयासह जान्हवी तिच्या फॅशनमुळे देखील अधिक करून ओळखली जाते. सोशल मीडियावर नेहमीच जान्हवी कपूर तिचे हटके फोटो शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने नवे फोटोशूट केले आहेत. यातील तिचा हॉट अंदाज चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे.
इनस्टाग्रामवर जान्हवी कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा जबरदस्त लुक दिसत आहे. या फोटोमध्ये तिने एक पेक्षा हटके चेहऱ्याचे हावभाव केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी कपूर ही आनंदी आणि उदास झाल्याचे दिसत आहे. यातील तिचा ग्लॅमसर अंदाज चाहत्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडला आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. दरम्यान जान्हवी नेहमीच तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर देखील तिचा जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.
Instagram पर यह पोस्ट देखें
दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूर एका सेलिब्रिटी कुटुंबातील असल्याने ती लहानपणापासूनच चर्चेत राहिली आहे. शालेय जीवनातही तिचे बालपण सामान्य मुलासारखे नव्हते. जान्हवी कपूरने एका मुलाखती दरम्यान ती लहान असतानाही कॅमेरा हा तिच्या आयुष्याचा एक भाग होता. लोक फोटो काढायचे आणि ग्रूमिंग नसेल तर तिची चेष्टाही करत असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूर ‘बवाल’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तिच्या सोबत अभिनेता वरून धवन मुख्य भूमिकेत होता. विशेष म्हणजे तिने पहिल्यांदाच वरुण धवन याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर जान्हवी कपूरचा काही दिवसांपूर्वीच मिली चित्रपट देखील रिलीज झाला आहे.