मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. त्यामुळे चाहत्यांना तिची प्रत्येक अपडेट मिळत असते. नुकतंच जान्हवीचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट ओटिटीवर प्रसिद्ध झाला आहे. चित्रपणानंतरच्या सुट्ट्या जान्हवी सध्या चांगल्याच एन्जॉय करतीय. जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केलेला साधा सेल्फी चाहत्यांच्या मनात चांगलंच घर करतोय.
जान्हवी कपूर नेहमीच आपला एक्सट्रीम बोल्ड अंदाज सर्वांसोबत शेअर करत असते.यावेळीही तिने साधा एक सेल्फी पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे हा मिरर सेल्फी असल्यामुळे ती आरशात स्वतः फोन घेऊन फोटो काढताना दिसत आहे.तिच्या बोल्ड लुकमुळे सेल्फी अगदी साधा असूनही चाहत्यांची त्याच्यावरून नजर हटत नाही. वर्कआऊटनंतर जान्हवी कपूरने हा सेल्फी क्लिक केल्याचे समजते.
कॉफी विथ करण 7 मध्ये जान्हवीने तिच्या सिंगल असल्याबद्दल सांगितले होते. हे ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना जान्हवी म्हणाली होती की, “मी अविवाहित राहून आनंदी आहे. होय, कधीकधी मला एकटेपणा जाणवतो पण मी आनंदी रहाते”.