मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. यापूर्वी अनन्याने लॅक्मे फॅशन वीकसाठी रॅम्प वॉक केला होता. अनन्या लवकरच विक्रम मोटवानी यांच्या चित्रपटात दिसणार आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असून, यात अनन्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
एकीकडे ती आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याच वेळी, अलीकडेच अनन्या तिची चुलत बहीण अलाना पांडेच्या मेहंदी समारंभात दिसली. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनन्या सिगारेट ओढताना दिसत आहे. आता या अनन्याच्या या कृत्यामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.
दरम्यान, अनन्या पांडे 14 मार्च रोजी तिची चुलत बहीण अलाना पांडेच्या मेहंदी समारंभात सहभागी झाली होती. यादरम्यान अनन्याने ऑफ-शोल्डर ब्लाउजसह बेबी पिंक कलरचा लेहेंगा घातला होता, त्यासोबत तिने पोनी बनवली होती. तसेच तिने न्यूड मेकअप केला होता. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे.
अनन्याच्या या लूकशिवाय तिचा एक फोटो ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे, ज्याचे कॅप्शन लिहिले आहे,’अनन्याने स्मोकर असणे अपेक्षित नव्हते. ही नॅपो मुलं एवढं हेल्थ फ्रिक असल्याचं भासवतात कसं माहीत नाही. असं म्हणत तिला ट्रोल केले जात आहे,