जमशेदपूर – करोना महामारीची झळ जवळपास सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या स्वरुपात बसली आहे. करोनाने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले तर दुसरीकडे अनेकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला आहे. मात्र या कठीण काळाचा अनेकांनी मोठ्या हिमतीने सामना केल्याचे बघायला मिळाले आहे. अशीच एक घटना जमशेदपूरमधून समोर आली आहे. एका सात वर्षीय तुलसीने शिक्षणासाठी केलेली कौतुकास्पद धडपड बघायला मिळाली आहे.
जमशेदपूरमधील तुलसीची परिस्थिती गरीबीची त्यात लॉकडाऊन त्यामुळे आणखीच आर्थिक चणचण मात्र तरीची तुलसीची शिक्षणाप्रती आवड बघून सर्व हैराण झाले आहे. करोनामुळे देशभरात ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. सात वर्षीय तुलशीला सुद्धा ऑनलाइन शिक्षण घ्यायचे होते मात्र त्यासाठी तिच्याकडे स्मार्ट फोन नव्हता फोन मिळवण्यासाठी तुलसीने लॉकडाऊन दरम्यान आंबे विकण्यास सुरुवात केली. तिला मोबाईल साठी दहा हजार रुपयांची आवश्यकता होती. मात्र तुलशीसाठी दहा हजार रुपये मिळविणे कठीण होते. पण आता तिची अभ्यासाची इच्छा पूर्ण झाली आहे. तुलसीची अभ्यासाप्रती आवड बघून तिच्याकडून अमेया हेटे व त्यांच्या वडिलांनी दहा आंबे 1.2 लाख रुपयात खरेदी केले.
व्हॅल्यूएबल एडुटेनर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमेया हेटे आणि तिचे वडील नरेंद्र हेटे यांनी दहा हजार रुपयांत एक आंबा विकत घेतला. तुलसीकडून बारा आंबे खरेदी केले. त्या बदल्यात तिला 1.20 लाख रुपये देण्यात आले. यासोबतच तिला एक मोबाईल फोन व दोन वर्षासाठी मोफत इंटरनेट देण्यात आले. ज्यामुळे तुलसीला ऑनलाइन अभ्यास करताना कोणतीही समस्या येणार नाही. हेटेंच्या या मदतीमुळे सात वर्षीय तुलसीच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला आहे.
अमेया हेटे आणि नरेंद्र हेटे केलेल्या या मदतीमुळे तुलसीचे वडील आंनदी झाल्याचे बघायला मिळाले आहे. या कठीण काळात हेटे परिवार देवा सारखे धावून आल्यामुळे मुलगी पुढचे शिक्षण करु शकणार असल्याची भावना तुलसीचे वडील श्रीमल कुमार यांनी व्यक्त केली आहे. यावेळी तुलशीची आई पद्मिनी देवी यांनी नरेंद्र हेटे यांचे आभार मानले. त्यांच्या मते आता तुलसीला आंबे विकावे लागणार नाहीत.