जामखेड – आमदार रोहित पवार हे संघर्ष यात्रा संपवून संघर्ष यात्रेचे मुद्दे व एमआयडीसीचा प्रश्न मांडण्यासाठी विधान भवनावर धडक मोर्चा घेऊन जात असताना पोलिसांनी रोहित पवार यांना अटक करून दबावतंत्राचा वापर केला होता. या अटकेच्या निषेधार्थ जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
या अटकेच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, शहाजी राळेभात, अमित जाधव, प्रशांत राळेभात,अशोक घुमरे, कुंडल राळेभात, राजेंद्र गोरे, डॉ. नरसाळे, उगले, दत्तात्रय सोले, वैजिनाथ पोले, संदीप गायकवाड तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अमित जाधव, शहाजी राळेभात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अमोल राळेभात यांनी कर्जत- जामखेडमध्ये एमआयडीसी येण्यासाठी रोहित पवारांनी मागील ४ वर्षे सतत पाठपुरावा केला,ती एमआयडीसी रद्द करून दुसरीकडे नेण्याचा घाट या सरकारने केला आहे.
युवकांसाठी रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांचे, मजुरांचे, महिलांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न याकडे पाठ फिरवून फक्त गळचेपी करण्याचे व युवा विचारांना दाबण्याचे काम हे सरकार करत आहे, याचा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी निषेध करून जामखेड शहरातील सर्व व्यापारी वर्गाने या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.