बिबवेवाडी, दि. 17 (प्रतिनिधी) -कात्रज परिसरातील आनंद दरबार येथे जैन धर्मगुरू प.पू. हिमानीची म. सा. यांच्या सानिध्यात आनंद दरबार मध्ये पूर्ण तिरंगामय वातावरणात झाले होते. आपल्या वाणीतून बोलताना प.पू. हिमानीचे म.सा. यांनी आपल्या तिरंगा तसेच मातृभाषेविषयी माहिती दिली. यावेळी संपतलाल भटेवरा, राजेंद्र गुगळे यांच्यासह जैन समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेचे कात्रज भागातील सर्व पदाधिकारी, सरस्वती विद्यामंदिर शाळेतील सर्व विद्यार्थी व संस्थापक शिवाजी जाधव, सन ब्राइट स्कूलचे विद्यार्थी व संदीप बेलदरे, मंदा भूमकर व अन्य शिक्षक यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना व समाजातील सर्वांना गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी बाळासाहेब धोका, विलास कोटेचा, संतोष दुगड, विजय लोढा, पोपटलाल पिरगळ, अभय धोका, हर्षद संचेती, लोकेश बाफना, अलोक धोका, दर्शन लोढा यांनी प्रयत्न केले. सर्व मान्यवरांचे स्वागत बाळासाहेब धोका यांनी तर सूत्रसंचालन महेश लुंकड यांनी केले.