पटियाला – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत पंजाब लोक कॉंग्रेसचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज पटियाला शहर मतदारसंघात संयुक्त रोड शो केला.
पंजाबात 20 तारखेला मतदान असून, त्याचा प्रचार आज सायंकाळी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचा हा रोड शो आयोजित करण्यात आला होता. या मतदारसंघातील अमरगड, मालेरकोटला भागातून त्यांनी रोड शो केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
हा मतदारसंघ अमरिंदरसिंग यांचा पारंपरिक प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो. या निवडणुकीत अमरिंदर सिंग यांच्या पक्षाने भाजपशी युती केली आहे.
या युतीचा यंदाच्या निवडणुकीतील हा पहिलाच प्रयोग आहे. तो लोक किती स्वीकारणार याचे राजकीय क्षेत्रात मोठे औत्सुक्य आहे.