जेधे कुटुंबियांचे पवारांकडून सांत्वन

पुणे – पुण्याचे माजी उपमहापौर जयसिंगराव जेधे यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेधे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी जयसिंगराव यांचे चिरंजीव जयराज जेधे,संताजी जेधे, बाळासाहेब जेधे, जगदीश जेधे इत्यादी उपस्थित होते.

पवारांचा व जयसिंगराव जेधे यांचा निकटचा संबंध होता. दोघांनी दीर्घकाळ एकत्र काम केले आहे. यावेळी पवारांनी केशवराव जेधे आणि शंकरराव मोरे यांच्या विषयीच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी अन्य जेधे कुटुंबियही उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.