बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तब्बल 10 महिन्यांनंतर आपल्य आईला भेटली आहे. या भेटीमुळे ती खूपच आनंदीत झाली आहे. या भेटीचे काही क्षण तिने सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर केले आहेत. याप्रसंगी ती आईसोबत खूपच आनंदी असल्याचे दिसते.
View this post on Instagram
Head over to @bazaarindia to check out my first digital cover!!! 💛💛 📸@saajan_singh23
जॅकलीनने हे क्षण आपल्या इंस्टा स्टोरीवर पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या व्हिडिओमध्ये जॅकलीन ही घरात प्रवेश करताच तिची आई कपड्यांना इस्री करत असल्याचे दिसते. यानंतर आपल्या मुलीला पाहुन तिचा आनंद गगनात मावेनासा असा होतो. जॅकलीनने या व्हिडिओला “आई येथे आहे’ असे कॅप्शन दिले आहे.
याशिवाय तिने अन्य दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यात ती आपल्या आईसोबत मस्ती करताना दिसत आहे. यात दोघींमध्ये असलेले प्रेम दिसून येते. कॅप्शनमध्ये जॅकलीनने लिहिले की, “आई, दहा महिने झाले मी तुला पाहिले नाही.’ जॅकलीनच्या या व्हिडिओला सर्वाधिक लाईकस् मिळाले आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जॅकलीन अपकमिंग हॉरर-कॉमेडी “भूत पुलिस’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे. यात जॅकलीनसोबत सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय जॅकलीन “किक-2’मध्ये सलमानसोबत काम करणार आहे.