पुणे – बॉलिवूडसाठी 2020 हे वर्ष खूपच निराशजनक असे ठरले. दिग्दर्शक, निर्मात्यांपासून ते कलाकारांपर्यंतचे सर्व काम ठप्प पडली होती. आता 2021चे आगमन झाल्यावर कलाकारांसह प्रेक्षकांना बॉलिवूडकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
या वर्षात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसकडे अनेक प्रोजेक्ट असल्याने खूप व्यस्त ठरणार आहे. जॅकलीनने नववर्षाची सुरूवात आपल्या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग सुरू करत केले आहे. तिने “सर्कस’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करत नवीन वर्षाचा जोरदार शुभारंभ केला आहे.
View this post on Instagram
याशिवाय जॅकलीनचे आणखी दोन चित्रपट रांगेत आहेत. “सर्कस’चे शूटिंग जानेवारीच्या मध्यापर्यंत चालणार आहे. यानंतर ती “भूत पुलीस’च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.
View this post on Instagram
यामुळे या संपूर्ण महिन्यात तिला एका दिवसाचादेखील ब्रेक मिळणार नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर सरकारने शूटिंगच्या नियमांमध्ये सूट देताच जॅकलीन पुन्हा कामावर परतली आहे. काही दिवसांपूर्वी तिने धर्मशाळा येथे “भूत पुलीस’च्या टीमसह शूटवर गेली होती.
View this post on Instagram
तिच्या आगामी चित्रपटांपैकी “भूत पुलीस’, “सर्कस’शिवाय “ऍटॅक’ चित्रपट साईन केला आहे. “ऍटॅक’मध्ये जॅकलीनसह जॉन अब्राहम, रकुल प्रीत झळकण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
दरम्यान, नेटफ्लक्सिवर रिलीज झालेल्या “मिसेज सीरियल किलर’मध्ये जॅकलीन झळकली होती. यात तिच्यासोबत मनोज वाजपेयीने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच लॉकडाऊनच्या काळात तिने सलमान खानसोबत एक व्हिडिओ सॉंग केले होते.
View this post on Instagram