Aishwarya Narkar: मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) सोशल मीडियावर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. अनेकदा तिला तिच्या व्हिडिओमुळे ट्रोलही केले जाते. आता पुन्हा ऐश्वर्या नारकर यांच्या एका नेटकऱ्याने टिका केली आहे. मात्र ट्रोल करणाऱ्या युझरला तिने सडेतोड उत्तर दिले आहे. यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.
वयाच्या 53 व्या वर्षी देखील ऐश्वर्या नारकर खूप उत्साही आहेत. स्वत: फिट ठेवण्यासाठी त्या खूप मेहनत देखील घेतात. त्यांच्या दिनचर्येचे फोटो त्या सोशल मीडियावरही शेअर करत असतात. ऐश्वर्या यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात त्या टीमबरोबर डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘डान्स हा खरा संघर्ष आहे’ असं कॅप्शन दिलं होतं. सोबतच त्यांनी हसणारे इमोजीही टाकले होते. त्यांच्या या व्हिडीओवर एका युजरने कमेंट करत ऐश्वर्या यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
View this post on Instagram
‘म्हातारपणी डान्स करणे कठीण आहे’ कमेंट मध्ये म्हटलं होतं. यावर ऐश्वर्या नारकर यांनी सुद्धा ‘तुम्ही तर करूच नका’ असं उत्तर दिलं. यापूर्वीही अनेकदा त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, ऐश्वर्या नारकर व त्यांचे पती अविनाश नारकर हे मराठी अभिनयसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. दोघेही त्यांचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. यावरून अनेकदा अविनाश नारकर यांना देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते.