कानपूर – हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार हिंदू धर्म ९० हजार वर्षे जुना आहे. नुकतेच उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे.
वसीम रिजवी यांनी धर्मांतर केल्यानंतर जितेंद्र नारायण सिंह त्यागी हे नवं नाव जोडलं आहे. ही बातमी ताजी असतानाच दुसरीकडे एका एक युवकाने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्याचा परिसरातील लोकांनी त्या युवकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सध्या या घटनेचा व्हिडियो सोशलवर व्हायरल होत असून या व्हायरल व्हिडियोतील मुलाचे नाव अस्लम आहे. तो उत्तरप्रदेशातील कानपूरच्या कर्नलगंज परिसरात राहतो. त्याने या संबंधित घटनेबाबत सांगितले की,’मी कर्नलगंज परिसरात राहत असून मी आमच्या परिसरातील व्यक्तींकडे मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून परिसरातील लोक संतापले आणि तेथे उपस्थित अली नावाच्या एका मुलाने मला बेदम मारहाण केली. त्यांनतर मी परिसरातील पोलीस चौकीमध्ये जाऊन याबाबत सांगितले. मात्र, या प्रकरणात पोलीस या तरुणाला मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले आहे.