मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणी समारंभासाठी निमंत्रण देण्यात आले आहे, पण मुख्यमंत्र्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे योग्य नाही असा आपला त्यांना सल्ला राहील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी म्हटले आहे.
तथापि त्यांच्या या वक्तव्यापासून राष्ट्रवादी पक्षाने मात्र फारकत घेतली आहे. हे मेमन यांचे व्यक्तीगत मत आहे, पक्षाची या विषयीची भूमिका स्पष्ट आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिल्यानंतर तेथील वाद आता संपुष्ठात आला असून ज्या कोणाला या कार्यक्रमाला जायची इच्छा आहे ते तेथे जाऊ शकतात असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार माजीद मेमन यांनी ट्विटवरून मुख्यमंत्र्यांना हीं सुचना केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला निश्चीतच उपस्थित राहतील कारण अयोध्यातील मंदिराचा मार्ग आमच्यामुळेच प्रशस्त झाला आहे असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता.
त्याच पार्श्वभूमीवर माजीद मेमन यांनी ही प्रतिक्रीया दिल्यामुळे नवीन पेच उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेच आपली भूमिका स्पष्ट केल्याने या वादावर पडदा पडला आहे.
Uddhav Thakrey is among invitees for bhoomi pujan of Ram Temple. He may participate respecting Covid 19 restrictions in his personal capacity. The head of a secular democracy should refrain from promoting a particular religious activity..
— Majeed Memon (@advmajeedmemon) July 21, 2020
My tweets are my personal views and not necessarily the NCP s version as I am not the authorised spokesperson of the party. Uddhav Thakrey has nor asked for my advice for Ayodhya visit and as such I am not in a position to say about what he has to do.
— Majeed Memon (@advmajeedmemon) July 21, 2020