वॉशिंग्टन – अवकाश संशोधनासाठी संयुक्त मोहिमा राबवणाऱ्या ‘आर्टेमिस ऍकॉर्ड’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ आणि अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ एकत्रिकतपणे अवकाश मोहिमा राबवू शकणार आहेत.
इस्रो आणि नासाची संयुक्त अवकाश मोहिम पुढील वर्षी राबवण्याबाबत सहमती झाल्याचे व्हाइट हाउसच्या माध्यमातून आज सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर ही मोहिम राबवण्यात येणार आहे. दोन्हही देश संयुक्तपणे ही मोहीम राबवणार असल्यामुळे दोन्हही देशांना याचा मोट फायदा होऊ शकतो.
‘ग्राऊंडेड इन आऊटर स्पेस ट्रीटी 1967’ म्हणजेच ‘आर्टेमिस’ करार हा अवकाश मोहिमांसाठीच्या तात्विक बांधिलकीचा करार आहे. 2025 मध्ये मानवाला चंद्रावर नेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून या करारामध्ये भारताने सहभागी होण्याकडे बघितले जाते आहे.
‘नासा’ आणि “इस्रो’ या वर्षी मानवी अंतराळ उड्डाण सहकार्यासाठी एक धोरणात्मक आराखडा विकसित करत आहेत. याव्यतिरिक्त, नासा आणि इस्रोने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर संयुक्त मोहिमेवर सहमती दर्शविली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.