कैरो, (इजिप्त) – गाझामधील तात्पुरता युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठी कैरोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वाटागाटींमधून इस्रायलने माघार घेतली आहे. वाटाघाटींपूर्वी हमासने आपल्या ताब्यात असलेल्या इस्राचयली नागरिकांची यादी उपलब्ध करून द्यावी आणि या यादीमध्ये जिवंत असलेल्या इस्रायली नागरिकांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी इस्रायलने केली होती.
इस्रायलच्या तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनींच्या आदला-बदलीच्या नियोजनासाठी ही यादी आवश्यक होती. मात्र तशी यादील हमासकडून न मिळाल्याने इस्रायलने या वाटागाटींमधून माघार घेतली आहे.
हमासने या अटींचे पालन केले नसल्यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोसादचे संचालक डेव्हिड बर्निया यांच्या समन्वयाने हा निर्णय घेतला आहे, असे इस्रायलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.