Israel Palestine Attack : इस्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली सुरक्षा दल हमासला चोख प्रत्युत्तर देत आहेत. त्यात इस्रायलला पहिले मोठे यश मिळाले आहे. इस्रायलच्या सुरक्षा दलांनी हमासचा नौदल कमांडर मोहम्मद अबू अली याला ताब्यात घेतलीची महत्वपूर्ण माहिती समोर अली आहे.
मोहम्मद अबू अली यांच्या ब्रिगेडने इस्रायली संगीत महोत्सवावर हल्ला केला होता. हमासचे कार्यालय असलेल्या प्रत्येक इमारतीला इस्रायलकडून आता लक्ष्य करण्यात येत आहे. इस्रायली हवाई दलाने दहशतवादी संघटना हमासचा टॉप कमांडर ज्या इमारतीत सैनिकांना सूचना देत होता त्या इमारतीवरही बॉम्बफेक केली. इस्रायलने हमास कमांडर मोहम्मद कास्ता यांच्या कार्यालयावरही बॉम्बफेक केली त्यामुळे तेथे असणारे सर्व दहशतवादी जागीच ठार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, इस्रायली-पॅलेस्टिनी युद्ध गाझाजवळ 7-8 पॉइंट्सवर सुरू आहे, या युद्धात दोन्ही बाजूंचे 1,100 हून अधिक लोक मारले गेले. इस्रायली माध्यमांनी सांगितले की, नागरिक आणि सैनिकांसह सुमारे 130 इस्रायली ओलीसांना शेजारील गाझा येथे नेण्यात आले आहे.
इस्रायली हवाई दलाने म्हटले आहे की जबलिया भागात मशिदीच्या मध्यभागी असलेली हमासची एक ऑपरेशनल इमारत देखील उडवण्यात आली. हमासच्या गुप्तचर विभागाने वापरलेली आणखी एक इमारतही इस्रायली हवाई दलाने पाडली.