मुंबई: गुजरातमध्ये नरोदामधील भाजपा आमदार बलराम थवानी यांनी एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीतू तेजवानी असे जखमी महिलेचे नाव असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर्ड प्रमुख आहेत. बलराम थवानी आणि त्यांचे समर्थक महिलेला मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षांनी या प्रकरणावर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी देशात कायद्याचे राज्य की भाजपा राज? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले गुजरातमध्ये भाजपा आमदाराकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी महिलेला मारहाण झाली, तरीही या घटनेबाबत गुन्हा दाखल होत नाही. देशात कायद्याचे राज्य आहे की भाजपा राज? असा सवाल नवाब मलिक यांनी केलाय. या घटनेचा निषेध करून ताक्ताळ कारवाई करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.
भाजपा पक्षाची महीलांबाबतची मानसिकता उघड झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. अशा प्रकारच्या घटना देशात वाढत आहेत, आणि सत्तेचा वापर करून ही प्रकरणे दाबण्याचे काम होत असल्याचा आरोपही वाघ यांनी केला. सत्तेचा असा गैरवापर करणाऱ्या या आमदाराला निलंबित करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांबाबतचा सन्मान बिंबवण्याची गरज आहे, असेही वाघ म्हणाल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या घटनेवर संताप व्यक्त केला. “भाजप नेते भाषणांमध्ये महिला सन्मानाबद्दल बोलणार आणि नंतर ह्याच भाजपचे आमदार मुलींना पळवून नेण्याची भाषा करणार आणि आता तर गुजरातमध्ये पाणीप्रश्नावर चर्चेसाठी गेलेल्या महिलेला भाजप आमदारांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हीच का भाजपाची संस्कृती?” असा प्रश्न मनसे नेत्यांनी उपस्थित केला आहे.
"भाजप नेते भाषणांमध्ये महिला सन्मानाबद्दल बोलणार आणि नंतर ह्याच भाजपचे आमदार मुलींना पळवून नेण्याची भाषा करणार आणि आता तर गुजरातमध्ये पाणीप्रश्नावर चर्चेसाठी गेलेल्या महिलेला भाजप आमदारांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हीच का भाजपाची संस्कृती?"- मनसे नेते @AviAbhyankarMNS pic.twitter.com/dyxwSMHoTV
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 3, 2019
सत्तेला जेव्हा माज येतो…
महिलांच्या अवमान करणे, त्यांना मारहाण करणे, हीच का तुमची नीती, हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स??@BJP4India @BJP4Maharashtra #Gujrat @narendramodi @PMOIndia pic.twitter.com/Nua4HXJwKm— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 3, 2019