VIDEO: मराठी विषयाचा खास वेगळा वर्ग पाहिला का?

पुणे: पुण्यातील विद्यानिकेतन शाळेत मराठी विषयाचा खास वेगळा वर्ग तयार करण्यात आला आहे. शाळेतील शिक्षका निर्मला खिलारे यांच्या कल्पनेतून हा वर्ग साकारला आहे.

मुलांमध्ये लहानपणापासून मराठी विषयी आदर आणि आवड निर्माण व्हायला हवी. मराठीतील साहित्य, ललित यांची ओळख व्हायला हवी आणि त्याच बरोबर मातृभाषेचे ज्ञान मिळायला हवे. यासाठी या अडगळीच्या वर्गाचं रूपांतर मराठी दालनात केलं, असं शिक्षिका निर्माला खिलारे यांनी सांगितलं.

दरम्यान, हा वर्ग विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सगळ्यांच्या मदतीने साकारला आहे. त्यात विद्यार्थी रामताना पाहून खूप आनंद होतो, असंही त्या म्हणाल्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.