कोरोनाचे इराणमध्ये 26 बळी

तेहरान : कोरोना विषाणूंची इराणमध्ये 245 जणांना बाधा झाली असून 26 जण मरण पावले आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रीांन दिली. इराणच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंडळाने याबाबत एक निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.

या मंत्रालयाचे प्रवक्ते किअनुश जहनपूर म्हणाले, या विषाणूंची बाधेची तपासणी करण्यासाठी सात प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या असून त्यांची संख्या आता 29 वर गेली आहे. दरम्यान महंद सादेघी या संसद सदस्याला बाधा झाली असून मी यातून वाचण्याची शक्‍यता कमी असल्याचे सांगणारा त्यांचा व्हिडिओ व्हयरल होत आहे. उपआरोग्यमंत्री इराज हरीरची यांनाही कोरोनाची बाधा झालीआहे.

Leave A Reply

Your email address will not be published.