बेंगळुरू – मांकडिंग बादवरून इंग्लंडचा जोस बटलर व भारताचा रवीचंद्रन अश्विन यांच्यातील द्वंद्व आतापर्यंत अनेकांनी पाहिले असेल. यंदा मात्र त्यांच्यातील ही स्पर्धा दिसणार नसल्याचे समोर आले आहे.
या दोन्ही खेळाडूंना राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात घेतले असल्याने बटलर मांकडिंग बाद होण्यापासून बचावणार असल्याची रंगतदार चर्चा सुरू झाली.
जेव्हा बटलर 2019 साली राजस्थान संघात होता, त्यावेळी अश्विन पंजाबकडून खेळत होता. त्या सामन्यात अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर येत असलेल्या बटलरला मांकडिंग पद्धतीने बाद केले होते व तेव्हा खिलाडूवृत्तीवरून प्रचंड चर्चा व वाद घडले होते. तोच धागा पकडून या दोन्ही खेळाडूंवर सध्या चाहते गमतीदार मीम्स पोस्ट करत आहेत.