शारजा : – ऑस्ट्रेलियाचा भरात असलेला फलंदाज स्टिव्ह स्मिथ याच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ आणि यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी देणारा धूर्त महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आजची लढत होत आहे.या सामन्यास काही वेळातच सुरूवात होणार आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा चेन्नईच्या बाजूने लागला आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
दरम्यान, स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सला पराभूत करताना धोनीने जबरदस्त माइंड गेम केला होता. त्यामुळे आता त्याचा प्रत्युत्तर कसे द्यायचे हा प्रश्न स्मिथच्या संघासमोर निर्माण झाला आहे.