कोलकाता – आयपीएल स्पर्धेची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षक काय करतील हे सांगता येत नाही. असाच एक बांगलादेशी चाहता व्हिसा न घेता देशाची सीमा ओलांडून भारतात घुसला होता. त्याला पोलीसांनी पकडल्यावर त्याने आयपीएलचे सामने पाहण्यासाठी भारतात आल्याचे सांगितले. मात्र, त्याच्याकडे व्हिसा तसेच अधिकृत कागदपत्रे नसल्याने त्याला बांगलादेश सुरक्षा यंत्रणेच्या हवाली करण्यात आले.
बांगलादेशमधील नारायणगंज जिल्ह्यातील पूर्व चांदपूर येथील रहिवासी असलेल्या महंमद इब्राहिम याने सामने पाहण्यासाठी भारतात घुसखोरी केली. या व्यक्तीला बांगलादेशच्या सिमा सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे.