दुबई – इंडियन प्रिमिअर लीग २०२४ च्या आवृत्तीसाठी खेळाडूंचा लिलाव उद्या दि. १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. भारताबाहेर आयपीएलचा लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या लिलावात सर्व फ्रँचायझी काही नवे खेळाडू विकत घेऊन त्यांचा संघ आणखी संतुलित करू इच्छितात. पुढील वर्षी आयपीएल २०२५ मध्ये मेगा लिलाव होणार आहे.
किती खेळाडूंचा समावेश?
एकूण खेळाडू ११६६
लिलाव कसा होणार?
खेळाडू 19 वेगवेगळ्या सेटमध्ये विभागले गेले आहेत. फलंदाज, वेगवान गोलंदाज, अष्टपैलू, फिरकी गोलंदाज, कॅप्ड आणि अनकॅप्ड असे अनेक संच आहेत. प्रत्येक संचाच्या आधारे बोली लावली जाईल. कॅप्ड आणि नंतर अनकॅप्ड खेळाडूंचा लिलाव होईल. एकूण 2३ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. त्यात मिचेल मार्श, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंचा समावेश आहे. १३ खेळाडूंची मूळ किंमत १.५ कोटी रुपये आहे.
निवड झालेले खेळाडू ३३३
भारतीय खेळाडू २१४
विदेशी खेळाडू ११९
अनुभवी खेळाडू ११६
नवोदित खेळाडू २१५
रिक्त खेळाडू ४७
रिक्त परदेशी खेळाडू ३०
कोण सहभागी होणार नाहीत?
इंग्लंडचे बेन स्टोक्स, जो रूट आणि जोफ्रा आर्चर हे या लिलावाचा भाग नाहीत. त्याचबरोबर केदार जाधव, लिटन दास आणि शाकिब अल हसन या खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही.
कोणते संघ सहभागी?
चेन्नई सुपर किंग्ज
दिल्ली कॅपिटल्स
गुजरात टायटन्स
कोलकाता नाइट रायडर्स
लखनौ सुपर जायंट्स
मुंबई इंडियन्स
पंजाब किंग्ज
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
राजस्थान रॉयल्स
सनरायझर्स हैदराबाद
यावेळी कोणत्या खेळाडूंना मोठ्या बोली लागतील?
ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला यावेळी सर्वात मोठी बोली लागू शकते. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रवरही संघ करोडोंचा खर्च करू शकतात. रचिनची मूळ किंमत फक्त ५० लाख रुपये आहे, मात्र एकदिवसीय विश्वचषकातील त्याची कामगिरी पाहता त्याच्यावर मोठी बोली लागण्याची खात्री आहे.
कोण श्रीमंत होऊ शकतात?
या लिलावात अर्शिन कुलकर्णी, कुमार कुशाग्रा आणि मुशीर खान सारखे खेळाडू करोडपती होऊ शकतात. अर्शीनने भारताच्या अंडर-१९ संघासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. तो बॉल आणि बॅट दोन्हीने सामने जिंकण्यास सक्षम आहे.