IPL Auction 2024 : आयपीएल लिलावाचे Live Streaming केव्हा, कुठे आणि कसे पाहाल? जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स…

IPL Auction 2024 Live Streaming & Venue : आयपीएल 2024 च्या लिलावाची प्रतीक्षा काही तासांत संपणार आहे. यावेळी 19 डिसेंबर रोजी दुबई येथे लिलाव होणार आहे. पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव परदेशी भूमीवर होत आहे. या लिलावात एकूण 333 खेळाडू असतील. आयपीएल लिलावात अनेक बड्या नावांवर नजर असेल, पण रचिन रवींद्र आणि अजमतुल्ला उमरझाई या उगवत्या स्टार्सवर पैशांचा पाऊस पडू शकतो. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली होती.
आयपीएल लिलाव लाइव्ह कसा पाहाल?
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आयपीएल लिलावचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. पण, तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर आयपीएल लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार नाही. वास्तविक, चाहत्यांना Jio Cinema अॅपवर लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. याशिवाय जिओ सिनेमाच्या वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता लिलाव सुरू होईल.
खेळाडूंना रिलीज केल्यानंतर कोणत्या संघांकडे किती पैसे आहेत?
RCB – 40.75 कोटी
SRH – 34 कोटी
KKR – 32.7 कोटी
CSK – 31.4 कोटी
PBKS – 29.1 कोटी
DC – 28.95 कोटी
MI – 15.25 कोटी
RR – 14.5 कोटी
LSG – 13.9 कोटी
GT – 13.85 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे सर्वाधिक पर्स (शिल्लक रक्कम) 40.75 कोटी रुपये आहेत. वास्तविक, या संघाने 11 खेळाडूंना सोडले. त्यात जोश हेझलवूड, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव यांचा समावेश आहे. त्याचवेळी, यानंतर सनरायझर्स हैदराबादकडे 34 कोटी रुपये शिल्लक आहेत.
Year Ender 2023 : रोहित शर्मासाठी 2023 वर्ष ठरले अनलकी! तीन वेळा हिटमॅन ठरला अपयशी…
त्याचवेळी, यानंतर सनरायझर्स हैदराबादकडे 34 कोटी रुपये आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स 32.7 कोटी रुपयांसह आयपीएल लिलावात उतरणार आहे. यानंतर चेन्नई सुपर किंग्जकडे 31.4 कोटी, दिल्ली कॅपिटल्सकडे 29.1 कोटी, मुंबई इंडियन्सकडे 15.25 कोटी , राजस्थान रॉयल्सकडे 14.5 कोटी आणि लखनौ सुपर जायंट्सकडे 13.85 कोटी रुपये शिल्लक आहेत.
प्रथमच आयपीएलचा लिलाव भारताबाहेर परदेशी भूमीवर आयोजित केला जात आहे. मंगळवारी दुबईतील कोका कोला एरिना येथे हा लिलाव होणार आहे.





