Indian Premier League 2024 (MI vs DC Match 20) :- आयपीएल 2024 मध्ये, दुहेरी हेडरचा पहिला सामना रविवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या वानखेडे मैदानावर यंदाच्या हंगामातील दुसरा सामना खेळणार आहे.
यंदाच्या हंगामात मुंबईची कामगिरी अत्यंत सुमार राहिलेली असून आत्तापर्यंत त्यांना तिनपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. तर दुसरीकडे दिल्लीनेही यंदा केवळ सामना जिंकलेला आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत 10 व्या तर दिल्लीचा संघ दोन गुणासह 9 व्या स्थानावर आहे. त्यामुळे, गुणतालिकेतील तळाच्या दोन संघांत हा सामना रंगणार आहे.
दरम्यान, कर्णधार हार्दिक पंड्या गुजरातमधील सोमनाथ मंदीरात पुजापाठ करून आल्यानंतर तरी मुंबईची हाराकिरी संपणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
MI vs DC : दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड…
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स 33 वेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, एमआयने 18 वेळा विजय मिळवला आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सने 15 सामने जिंकले आहेत. उभय संघांमधील सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या मुंबई इंडियन्सने 218 धावांची केली होती. तर, दिल्ली कॅपिटल्सने एमआयविरुद्ध सर्वाधिक 213 धावा केल्या आहेत.
MI vs DC : दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
Mumbai Indians Probable Playing XI : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल, क्वेना माफाका.
Delhi Capitals Probable Playing XI : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, रसिक सलाम, एनरिक नोरखिया, इशांत शर्मा, खलील अहमद.