Indian Premier League 2024 (LSG vs GT Match 21) : आयपीएल 2024 मध्ये, दुहेरी हेडरचा दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज( 7 एप्रिल, रविवारी) खेळला जाईल. दोन्ही संघ आयपीएलमध्ये नवीन आहेत आणि केवळ काही सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत.
रविवारी होणाऱ्या सायंकाळी होणाऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटन्स आपल्या स्पर्धेतील तिसऱ्या विजयासाठी एकमेकांना भीडणार आहेत. हा सामना लखनौ येथील एकना स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. आयपीएल सामन्यांच्या रेकॉर्डनुसार येथे एकूण 8 सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ तीन वेळा यश मिळाले आहे. या मैदानाच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांच्या खात्यात ५६.७ टक्के विकेट्स आल्या आहेत. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज एकानामध्ये वर्चस्व गाजवणार असल्याचे स्पष्ट होते.
आयपीएल 2024 मध्ये, लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. यासह ते गुणतालिकेत 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत. GT 4 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
LSG vs GT : दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड…
लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही नवीन संघ आहेत आणि त्यांचा फक्त तिसरा आयपीएल हंगाम खेळत आहेत. आयपीएलमध्ये दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. गुजरात टायटन्सने हे चारही सामने जिंकले आहेत. एलएसजीला अद्याप जीटीसमोर विजयाचे खाते उघडता आलेले नाही.
IPL 2025 : पंड्याच्या नेतृत्वावर नाराज; पुढील मोसमात रोहित शर्मा अन्य संघाकडून खेळणार..?
LSG vs GT : दोन्ही संघाचे संपूर्ण स्क्वॉड…
लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिककल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, क्रुणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौतम, शिवम मावी, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद. अर्शद खान.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल., मोहित शर्मा, अजमतुल्ला उमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर.