Indian Premier League 2024 (GT vs PBKS Match 17) : आज IPL 2024 चा 17 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळला जात आहे. हा सामना 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात गुजरात टायटन्सची नजर पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या मैदानावर विजयाकडे असेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांत पराभव पत्करलेला शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.
तत्पूर्वी, गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने टाॅस जिंकला आहे. पंजाबचा कर्णधार शिखर धवनने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा कर्णधार धवनने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी सिकंदर रझाला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलनेही बदल केला असून डेव्हिड मिलरला प्लेइंग-11 मध्ये स्थान दिलेले नाही. मिलरच्या जागी केन विल्यमसनला संधी देण्यात आली आहे, जो आयपीएलच्या या मोसमातील पहिला सामना खेळणार आहे.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL win the toss and elect to bowl against @gujarat_titans
Follow the Match ▶️ https://t.co/0Sy2civoOa #TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/jgND8Lz07O
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2024
GT vs PBKS : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
Gujarat Titans : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विल्यमसन, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नळकांडे.
Impact Player : बीआर शरत, मोहित शर्मा, संदीप वॉरियर, अभिनव मनोहर, मानव सुथार
Punjab Kings : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हर्षल पटेल, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
Impact Player : तान्या थियागराजन, नॅथन एलिस, आशुतोष शर्मा, राहुल चहर, विद्वत कावरप्पा
आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत तर एकच सामना गमावला आहे. 4 गुणांसह गुजरात गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा पहिला सामना जिंकला होता, पण तेव्हापासून ते संघर्ष करत आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाबने 3 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे तर 2 पराभव पत्करले आहेत.
दरम्यान, जर आपण गुजरात आणि पंजाब यांच्यातील हेड टू हेड रेकाॅर्ड बद्दल बोललो तर दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त तीन वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात गुजरातने दोनदा विजय मिळवला आहे. पंजाबने एकदाच विजय मिळवला आहे.