IPL 2024 (GT vs PBKS Match 17) : आज IPL 2024 चा 17 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळला जात आहे. हा सामना 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात गुजरात टायटन्सची नजर पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या मैदानावर विजयाकडे असेल. दुसरीकडे, गेल्या दोन सामन्यांत पराभव पत्करलेला शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.
तत्पूर्वी, गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने टाॅस जिंकला आहे. पंजाबचा कर्णधार शिखर धवनने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL win the toss and elect to bowl against @gujarat_titans
Follow the Match ▶️ https://t.co/0Sy2civoOa #TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/jgND8Lz07O
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2024
आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत तर एकच सामना गमावला आहे. 4 गुणांसह गुजरात गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा पहिला सामना जिंकला होता, पण तेव्हापासून ते संघर्ष करत आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाबने 3 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे तर 2 पराभव पत्करले आहेत.
IPL 2024 Viewership : पहिल्या 10 सामन्यांमध्येच IPL 2024 ने तोडले सर्व व्यूअरशिपचे जुने रेकॉर्ड…
दरम्यान, जर आपण गुजरात आणि पंजाब यांच्यातील हेड टू हेड रेकाॅर्ड बद्दल बोललो तर दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त तीन वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात गुजरातने दोनदा विजय मिळवला आहे. पंजाबने एकदाच विजय मिळवला आहे.