Indian Premier League 2024 (Live Cricket Score, CSK vs LSG) : आज, आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. या सामन्यास चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होईल.
गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स आज (मंगळवारी) चेपॉक स्टेडियमवर आमने-सामने असतील, तेव्हा मागील पराभवाचा बदला घेण्याचे आणि गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याचे चेन्नईचे लक्ष्य असेल. कारण, या मोसमातील (IPL 2024) शेवटच्या सामन्यात लखनौने चेन्नईचा 8 गडी राखून पराभव केला होता. हा सामना 19 एप्रिल रोजी लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला होता.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (Toss Update) कौल हा लखनौ सुपर जायंट्स संघाच्या बाजूनं लागला आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने चेन्नईविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Lucknow Super Giants Won the Toss & elected to Field) त्यामुळं चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील. राहुलने सांगितले की, त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी चेन्नईचा कर्णधार रुतुराजने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. आउट ऑफ फॉर्म असलेल्या रचिन रवींद्रच्या जागी डॅरिल मिशेलचे पुनरागमन झाले आहे.
CSK vs LSG : दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे…
चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथिराना. ( इम्पॅक्ट सब : समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर)
लखनौ सुपरजायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर. ( इम्पॅक्ट सब : देवदत्त पडिक्कल, अर्शिन कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, यादववीर सिंग चरक, एम सिद्धार्थ)
या मोसमात 7 पैकी 4-4 सामने जिंकून सीएसके चौथ्या आणि लखनौ पाचव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत आणखी पुढे जायचे आहे. अशा स्थितीत दोघांमध्ये आज चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल.
चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 4 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये लखनौने 2 सामने जिंकले असून चेन्नईने एक सामना जिंकला आहे, तर एका सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही. म्हणजेच बघितले तर लखनौचा संघ चेन्नईवर भारी पडत असल्याचे दिसते.