IPL 2024 : या मोसमात चौकार-षटकार मारण्यात ‘हे’ फलंदाज आहेत आघाडीवर..! जाणून घ्या, ‘टॉप 5 खेळाडूंची नावे…

Most Fours and Sixes in IPL 2024 : आयपीएल 2024 चा 39 वा सामना आज होणार आहे, ज्यामध्ये चेन्नई आणि लखनौ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी जाणून घ्या, कोण आहेत ते टॉप 5 खेळाडू ज्यांनी आतापर्यंत सर्वाधिक चौकार आणि षटकार मारले आहेत.
आयपीएल 2024 मध्ये खूप धावांचा पाऊस पडत आहे. फलंदाजही चौकार-षटकार मारण्यास मागे हटत नाहीत. या मोसमातील 35 व्या सामन्यापर्यंत फलंदाजांनी एकूण 618 षटकार ठोकले आहेत. यामुळेच या मोसमात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्याही बनली. येथे जाणून घ्या, आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक चौकार आणि षटकार ठोकणारे टॉप 5 खेळाडू कोण आहेत.
सर्वाधिक चौकार मारणारे टॉप 5 खेळाडू :-
आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ट्रॅव्हिस हेड पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 6 सामन्यात 39 चौकारांच्या मदतीने 324 धावा केल्या आहेत. यानंतर दुसरे नाव विराट कोहलीचे आहे. कोहलीने 8 सामन्यात 36 चौकारांसह 379 धावा केल्या आहेत. रोहित शर्माचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 8 सामन्यात 31 चौकारांसह 303 धावा केल्या आहेत. फिल सॉल्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सॉल्टने 7 सामन्यात 31 चौकारांच्या मदतीने 249 धावा केल्या आहेत. तर संजू सॅमसन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. संजूने 8 सामन्यात 29 चौकारांसह 314 धावा केल्या आहेत.
सर्वाधिक षटकार मारणारे टॉप 5 खेळाडू
आयपीएल 2024 मध्ये षटकार मारण्याच्या बाबतीत हेनरिक क्लासेन पहिल्या क्रमांकावर आहे. हेनरिकने 7 सामन्यात 26 षटकार ठोकले आहेत. या यादीत अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. अभिषेकने 7 सामन्यात 24 षटकार मारले आहेत. या यादीत सुनील नारायण यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. नारायणने 7 सामन्यात 20 षटकार मारले आहेत. या यादीत रियान पराग चौथ्या क्रमांकावर आहे. रियानने 8 सामन्यात 20 षटकार मारले आहेत. या यादीत निकोलस पुराण पाचव्या क्रमांकावर आहे. पुरणने 7 सामन्यात 20 षटकार ठोकले आहेत.
Team India : ‘या’ 9 खेळाडूंचे T20 विश्वचषक संघातील स्थान निश्चित, IPLमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी…
एका डावात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणारे खेळाडू…
केकेआर (KKR) च्या फिल सॉल्टने IPL 2024 मध्ये ईडन गार्डन्स येथे हैदराबाद (SRH) विरुद्ध एका डावात सर्वाधिक चौकार मारले. सॉल्टने त्या सामन्यात 14 चौकारांसह 89 धावा केल्या होत्या.
हैदराबादच्या (SRH) च्या हेनरिक क्लासेनने IPL 2024 मध्ये ईडन गार्डन्स येथे KKR विरुद्ध एका डावात आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्या डावात क्लासेनने 63 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 8 षटकारांचाही समावेश होता.






