मुंबई – आयपीएल 2023 चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून प्ले ऑफ मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी सर्वच संघ कंबर कसत आहेत. आजचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा रंगणार असून हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
आजच्या सामन्यात जर गुजरात चा संघ जिंकला तर, तो प्ले ऑफ आपले स्थान निश्चित करू शकतो. तसेच मुंबईने सुरवातीच्या सामन्यांमध्ये खराब कामगिरी केली होती परंतु आता मुंबईने सुद्धा आपली गाडी पुन्हा एकदा विजयाच्या रुळावर आणली आहे. तसेच मुंबईने आजचा सामना जर जिंकला तर प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे जाईल. त्यामुळे आजचा सामना हा हाय व्होल्टेज असणार आहे.
असे असतील दोन्ही संघ…
गुजरात टायटन्स –
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
मुंबई इंडियन्स –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, तिलक वर्मा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ.