बंगळुरू : सोमवारी रात्री लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बंगळुरू सामना रंगला याच सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने रॉयल चॅलेंज बंगळुरू विरुद्ध रोमहर्षक विजय मिळवत चिन्नास्वामी स्टेडियमवर इतिहास रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात लखनौ ने आत्तापर्यंत चौथ्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
या विजयानंतर लखनौ संघाचा मेंटर गौतम गंभीर प्रचंड आनंदी दिसून आला आहे.परंतु या विजयाच्या जल्लोषादरम्यानचा गौतम गंभीरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.जो कि सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमका काय घडलं व्हिडिओमध्ये…
गौतम गंभीर संघाच्या विजयामुळे आनंदी दिसत होता.तो आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी मैदानात गेला आणि आरसीबीच्या चाहत्यांकडे बघत आपल्या तोडांवर बोट ठेवून इशारा दिल्याचे दिसून येत आहे. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, आरसीबीविरुद्धच्या शेवटच्या ओव्हर मध्ये लखनौला विजयासाठी 5 रन्स गरज होती. मार्क वुड आणि जयदेव उनाडकट ही जोडी क्रीझवर होती. आरसीबीला 6 बॉल्समध्ये दोन विकेट्स घेण्यात यश आले. पण शेवटच्या बॉलवर लखनौच्या बॅट्समनने डॉट बॉलवर बाय करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे.
लखनौ चा धडाकेबाज बॅट्समन निकलस पूरन याने अवघ्या 15 बॉल्स मध्ये अर्धशतक झळकावले असून हे आयपीएल 2023 मधील सर्वात वेगवान शतक ठरले आहे. या विजयासह लखनौ सुपरजायंट्सचा संघ गुणतालिकेत प्रथम स्थानावर पोहोचला असून. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.