दुबई : नशीब बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात. कोणीतरी म्हटले आहे की, जेव्हा देव देतो, तेव्हा छप्पर फाडून देतो, ही म्हण आज खरी असल्याचे दिसले. असंच काहीसं भारतीय वंशाच्या ड्रायव्हर अजय ओगुला (Ajay Ogula) सोबत घडलं. दुबईत ड्रायव्हर म्हणून काम करणारा 31 वर्षीय अजय रातोरात करोडपती झाला आहे. (South Indian Driver In Dubai Wins Rs 33 Crore Lottery In Emirates Draw) त्याने अमीरातीमध्ये (UAE) लकी ड्रॉ मध्ये 33 कोटींचे बक्षीस जिंकले आहे.
एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर अजय ओगुला म्हणाला की, मी जॅकपॉट जिंकला आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. त्यांनी सांगितले की, या रकमेतून ते चॅरिटी ट्रस्ट स्थापन करणार आहेत, जेणेकरून त्यांचे मूळ गाव आणि शेजारच्या गावांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करता येईल.
खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, अजय ओगुला हा मूळचा दक्षिण भारतातील एका खेड्यातील असून चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आला होता. सध्या अजय एका ज्वेलरी फर्ममध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. तो दर महिन्याला 72 हजार रुपये कमावतो. पण आता तो करोडपती झाला आहे.
अजयने सांगितले की, जेव्हा त्याने भारतातील आपल्या कुटुंबाला आपण करोडपती झाल्याचे सांगितले तेव्हा त्याच्या आई आणि भावंडांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. पण मीडियात ही बातमी आल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
अजयने सांगितले की, मी पहिल्यांदा तिकीट खरेदी केलं होतं. मला फक्त लकी ड्रॉ कसा खेळतात हे पाहायचं होतं म्हणून तिकीट खरेदी केलं होतं. आपण इतकी मोठी किंमत जिंकू असं एकदा सुद्धा वाटलं नव्हतं. पण नशीब बदललं आणि EASY6 Grand Prize (इजी6 ग्रॅण्ड प्राईज) मध्ये अजयला 33 कोटी रुपयांची लाॅटरी लागली.
Tamil Nadu Politics : ‘त्या’ पूर्वी AIADMK च्या दोन गटात मनोमिलन होईल – शशिकला
अजयने सांगितले की, त्याला वाटले की त्याने कमी रक्कम जिंकली असेल पण जेव्हा त्याने मेसेज वाचला तेव्हा झिरो संपण्याचे नाव घेत नव्हते, हे पाहून आपण एवढी मोठी रक्कम जिंकली यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.