मुंबई – आयपीएल 2022 मध्ये रविवारी दोन सामने खेळवण्यात आले आणि या सामन्यांच्या निकालांमुळे गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. चेन्नईवर तीन गडी राखून विजय मिळवत गुजरातने या हंगामातील पाचवा विजय मिळवला असून त्यांचे 10 गुण झाले आहेत आणि गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे.
दुसरीकडे लखनौ दुसऱ्या तर आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचा संघ अव्वल चारमधून बाहेर आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर खराब सुरुवात करणाऱ्या हैदराबादने सलग चार सामने जिंकून अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवले आहे.
मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सलग सहा सामने गमावले आहेत. त्याचवेळी चेन्नईनेही सहापैकी एकच सामना जिंकल्याने आता या दोन संघांसाठी प्लेऑफचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर जवळपास प्रत्येक सामना जिंकावा लागेल.
गुणतालिकेची स्थिती (ही आकडेवारी सामना क्र. 29 गुजरात वि चेन्नई सामन्यानंतरची आहे.) –
सोमवारी (दि.18) चेन्नईचा तीन गडी राखून पराभव केल्यामुळे गुजरातने पाचवा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान राखले.
तर लखनौ संघ दुसऱ्या तर बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. सलग चार सामने जिंकणाऱ्या हैदराबाद संघाने अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवले आहे.
राजस्थान पाचव्या तर कोलकाता सहाव्या स्थानावर आहे. हैदराबादविरुद्ध पराभूत झालेला पंजाब सातव्या स्थानावर घसरला आहे.
दिल्ली आठव्या, चेन्नई नवव्या आणि मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे. आता चेन्नई आणि मुंबईसाठी प्लेऑफचा रस्ता कठीण झाला आहे.
राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. त्याने 5 सामन्यात 272 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर लोकेश राहुल यंदाही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. राहुलने 6 सामन्यात 235 धावा केल्या असून बटलरनंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टी नटराजनने पर्पल कॅपच्या शर्यतीत युझवेंद्र चहलची बरोबरी केली आहे. दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत 12 विकेट घेतल्या आहेत. नटराजनने 6 तर चहलने 5 सामने खेळत ही कामगिरी केली आहे.